Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लग्नाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार मायणीतील चौघांवर गुन्हा

लग्नाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार
मायणीतील चौघांवर गुन्हासांगली : खरा पंचनामा

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर तीन वर्षे अत्याचार करण्यात आला. तिने लग्नासाठी तगादा लावल्यानंतर तिला खानापूर तालुक्यातील माहुली येथे बोलावून शिवीगाळ दमदाटी करण्यात आली. याप्रकरणी चौघांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक बाळासो थोरात, वंदना थोरात, विकी पवार आणि दिपक कणसे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. 

पीडित तरूणी एका कंपनीत काम करते. तिची काही वर्षापूर्वी संशयीत प्रतिक थोरात याच्याशी ओळख झाली. प्रतिकसह अन्य तिघांनी पीडितेस लग्नाचे आमिष दाखविले. तसेच संशयीत प्रतिक याने पीडितेवर वारंवार अत्याचार केले. हा प्रकार दि. १६ एप्रिल २०२१ ते दि. १ ऑगस्ट २०२३ या कालावधीत घडला. 

दरम्यान मध्यंतरी खानापूर तालुक्यातील माहुली येथे संशयीतांनी पीडितेस लग्नाचे बोलणी करण्याकरिता बोलवले. तेथे पीडितेस धक्काबुक्की करुन प्रतिकसोबत तुझे लग्न लावून देणे शक्य नसल्याचे सांगून तिला शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास सांगलीचे पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव करीत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.