Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एक्साईजचे 'ते' अधिकारी शासनाचे जावई आहेत का? दुर्धर आजाराच्या अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी टेंडर भरण्याची मागणी

एक्साईजचे 'ते' अधिकारी शासनाचे जावई आहेत का?
दुर्धर आजाराच्या अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी टेंडर भरण्याची मागणी



मुंबई : खरा पंचनामा

विधीमंडळाचे नुकतेच संपलेले पावसाळी अधिवेशन विविध कारणांनी चांगलेच गाजले. विशेष म्हणजे या अधिवेशनात सत्ताधारी आमदारांनीच राज्य उत्पादन शुक्लच्या (एक्साईज) कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले. दुर्धर आजार असणाऱ्या अधिकाऱ्यांना सोयीच्या ठिकाणी बदली देण्यासाठी चक्क टेंडर भरण्याची मागणी एका हिऱ्याने केल्याचे स्पष्ट झाले. शिवाय भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी तर त्या दोन निरीक्षकांचा लाड का केला जात आहे असा प्रश्नही उपस्थित केला. एक्साईजचे ते दोन अधिकारी शासनाचे जावई आहेत का असा प्रश्न आता विचारला जात आहे. 

काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार भाई जगताप यांनी विधीमंडळात याबाबत प्रश्न उपस्थित केला. ठरावीक अधिकाऱ्यांना राज्य उत्पादन शुल्क मंत्री पाठीशी घालत असल्याचा आरोप विधीमंडळात करण्यात आला. याबाबत लक्ष्यवेधीवर चर्चा करताना सत्ताधारी आमदारही मंत्र्यांवर अक्षरशः तुटून पडले. त्या दोन अधिकाऱ्यांमध्ये एवढी मस्ती कोठून येते? हे अधिकारी लोकप्रतिनिधींनाही जुमानत नाहीत. त्यांच्यावर काय कारवाई करणार? असा सवालही आमदार दरेकर यांनी विधीमंडळात केला. त्यावेळी दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी आपल्या स्तरावर करू असे म्हणत संबंधित मंत्र्यांनी त्या दोघांना पुन्हा पाठीशी घातल्याचे बोलले जात आहे. 

यावेळी आमदार दरेकर यांनी त्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा अशीही मागणी केली. एकाच ठिकाणी ९ ते १२ वर्षे हे अधिकारी ठाण मांडून आहेत. त्यामुळे ते अधिकारी बेमुर्वत बनले आहेत. तर भाई जगताप यांनी कोकण विभागातच बदलीसाठी या अधिकाऱ्यांचे अर्ज कसे येतात? यात मोठा भ्रष्टाचार असून पैशाची उलथापालथ झाली आहे. सरकारचा हेतू शुद्ध असेल तर कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करणार का असा प्रश्नही भाई जगताप यांनी उपस्थित केला. 

दुर्धर आजार असलेल्या अधिकाऱ्यांना टेंडर भरण्याचा सल्ला!
दरम्यान एक्साईजमध्ये बऱ्याच अधिकाऱ्यांना कॅन्सर, पक्षाघात, हृदयविकार असे दुर्धर आजार असलेल्या अधिकाऱ्यांना सोयीच्या ठिकाणी बदली करणे गरजेचे असते. मात्र त्यांच्या विनंती अजार्चा कोणताही विचार केला जात नाही. शिवाय कार्यकाल पूर्ण होऊनही त्यांच्या बदल्या मेडिकल बेसवरही केल्या जात नाहीत असा आरोप केला जात आहे. यावषीर् अशा दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या अधिकाऱ्यांनाही टेंडर भरण्याचा सल्ला एका हिऱ्याने दिल्याची चर्चा आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.