Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चोरीला गेलेल्या कापसाचे पैसे परत मिळाल्याने शेतकऱ्याला अश्रू अनावर! चकलांबा पोलिसांची तातडीने कारवाई

चोरीला गेलेल्या कापसाचे पैसे परत मिळाल्याने शेतकऱ्याला अश्रू अनावर!
चकलांबा पोलिसांची तातडीने कारवाई


   
बीड : खरा पंचनामा

गेवराई तालुक्यातील फुलसावंगी येथील शेतकरी महेश काशिनाथ धांडे यांनी आयशर कंपनीचा टेम्पो एकूण किंमत अंदाजे आठ लाख रुपये कापसासह चोरीला गेल्याची फिर्याद चकलांबा पोलिस ठाण्यात दिली होती. तेथील प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी तातडीने तपास करत शेतकऱ्याला चोरीला गेलेल्या मुद्देमालातील 5 लाखांची रक्कम परत मिळवून दिली. यामुळे त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

फिर्याद दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी तपासाची जलद गतीने चक्रे फिरवत तांत्रिक पद्धतीने कसोशीने तपास करून चौघांना अटक केली. दीपक शामराव लांडगे (वय 21, रा. पांगरा तांडा ता. घनसांगवी जि. जालना), अनिल ईश्वर पाटील (वय 35, रा निपाणी ता. पारोळा जि. जळगाव), राजेंद्र सुरेश भुमरे (वय 32, रा. कुंजर ता. चाळीसगाव जि. जळगाव), दिलीप महादू चौधरी (रा. कुंजर ता. चाळीसगाव जि. जळगाव) याना अटक केली.

त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या कापसाचे एकूण पाच लाख रुपये रोख रक्कम हस्तगत केली होती. याप्रकरणी बुधवारी न्यायालयाने सदर रक्कम पीडित शेतकऱ्यास देण्याबाबत आदेश दिले. त्यानुसार ती रक्कम अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्याहस्ते पीडित शेतकऱ्यास देण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.