Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ऑनलाईन फसवणूक : सव्वा तीन लाख तात्काळ केले परत! सांगली 'सायबर’ची कारवाई

ऑनलाईन फसवणूक : सव्वा तीन लाख तात्काळ केले परत!
सांगली 'सायबर’ची कारवाईसांगली : खरा पंचनामा

आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगत क्रेडिट कार्ड ॲक्टीवेट करण्यासाठी पाठविलेली लिंक ओपन करण्यास सांगून एका महिलेची सव्वा तीन लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली होती. महिलेने सांगलीच्या सायबर शाखेशी संपर्क साधला. तेथील पोलिसांनी तांत्रिक तपास करत संबंधिताचे खाते गोठवले आणि महिलेस ती रक्कम परत मिळवून दिली. 

पलूस तालुक्यातील कुंडल येथील स्वाती सतपाल नलवडे यांना २३ मे रोजी एका क्रमांकावरून फोन आला होता. यावेळी त्या व्यक्तीने नलवडे यांना आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगतले. क्रेडिट कार्ड ॲक्टीवेट करण्यासाठी एक लिंक दिली. ती लिंक ओपन करण्यास सांगितले. ती लिंक ओपन करून माहिती भरल्यानंतर अवघ्या काही वेळात नलवडे यांच्या बँक खात्यातील ३ लाख ७९ हजार ९२६ रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली. 

नलवडे यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तांत्रिक तपास केला. त्यावेळी क्रोमा रिटेल या खरेदीच्या प्लॅटफॉर्मवर गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर रक्कम गोठवण्यात आली. तपास करून तीन लाख २९ हजार ९२६ रुपयांची रक्कम महिलेस परत मिळवून देण्यात सायबर शाखेला यश आले.

पोलिस निरीक्षक संजय हारूगडे, उपनिरीक्षक रोहिदास पवार, करण परदेशी, अजय पाटील, स्वप्निल नायकोडे, विवेक साळुंखे, कॅप्टन गुंडवाडे, श्रीधर बागडी, महिला अंमलदार कोळी यांनी ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.