Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

माझ्यासारख्या गरीबाला का विचारता?

माझ्यासारख्या गरीबाला का विचारता? 



मुंबई : खरा पंचनामा 

मी कालपासून मुंबईतच आहे. मी पुण्याला गेल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमेच चालवत आहेत. या बातम्यांमुळे माझं मनोरंजन झालं असं जयंत पाटील यांनी या भेटीच्या वृत्तासंदर्भात माध्यमांशी बोलताना सांगितलं. मी पुण्याला गेलो हे तुम्हीच सांगताय. मी अमित शाहांना भेटलो आणि अजित पवार गटाबरोबर जाणार आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं? अशा राजकीय वर्तुळात चर्चा असतील तर जे चर्चा करतात त्यांना जाऊन विचारा. माझ्यासारख्या गरीबाला का विचारता? मी कालही इथेच होतो, आजही इथेच आहे आणि उद्याही इथेच असणार. मला का विचारताय? असा प्रतिप्रश्न जयंत पाटील यांनी माध्यमांना केला. 

मी अमित शाहांना कधी भेटलो याचं संशोधन करा. बातम्या तुम्हीच तयार केल्या. मी काय सांगितलं का तुम्हाला? मी कशासाठी स्पष्ट करायचं? रोज सकाळी उठून स्पष्टीकरण द्यायचा मी धंदा काढलेला आहे की काय? अशा शब्दांमध्ये जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना लक्ष्य केलं. "तुम्ही बातम्या तयार केल्या. तुम्ही त्या बातम्या संपवा. तुम्ही ज्या बातम्या चालवल्या ज्यामुळे मी कुठं गेलो, कसा गेलो त्याचे काही पुरावे दिसले, माहिती मिळाली तर त्यावर बातम्या करा. 

आता रोज उठून नव्या बातम्या करायला लागलात, एखाद्याबद्दल महराष्ट्रात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तर हे बरोबर नाही. खरं तर काय झालं काय नाही याचा अभ्यास बातमी देणाऱ्याने केला पाहिजे. सकाळपासून मला सगळ्या मनोरंजक बातम्या मिळत आहेत. सगळ्या बातम्या येत आहेत. 

मी इकडे गेलो, पुण्याला गेलो. राजेश टोपे, अनिल देशमुख, सुनील भुसाला, मी आणि माझ्याबरोबर अजून एकजण रात्री एक दीड वाजेपर्यंत इथेच बसलो होतो. सकाळी शरद पवारांच्या घरी होतो तर मी तिकडे कधी गेलो ? काल संध्याकाळी पवार साहेबांच्या घरी होतो," असं जयंत पाटील म्हणाले.


कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.