Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

हातभट्टी निर्मिती, विक्री करणारा वषार्साठी 'येरवड्या'त स्थानबद्ध! राज्य उत्पादन शुल्कची पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच एमपीडीएची कारवाई

हातभट्टी निर्मिती, विक्री करणारा वषार्साठी 'येरवड्या'त स्थानबद्ध!
राज्य उत्पादन शुल्कची पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच एमपीडीएची कारवाई



कोल्हापूर : खरा पंचनामा

वारंवार कारवाई करूनही हातभट्टी दारूची निर्मिती आणि विक्री करणाऱ्या एकाला वषार्साठी पुण्यातील येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबतचे आदेश दिले आहे. राज्य उत्पादन शुल्कने स्वतंत्रपणे एमपीडीएअंतर्गत केलेली पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिलीच कारवाई असल्याची माहिती अधीक्षक रविंद्र आवळे यांनी दिली. 

सचिन सदाशिव मदने (रा. दानोळी, ता. शिरोळ, मूळ रा. मुडशिंगी, ता. हातकणंगले) अशी कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे. मदने हा बेकायदेशीररित्या हातभट्टी दारूची निर्मिती करून त्याची विक्री तसेच वाहतूक करत असतो. त्याच्या या कृत्यामुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असून धोका निर्माण झाला आहे. त्याच्यावर वारंवार सातत्याने कायदेशीर कारवाई करूनही त्याचा अवैध व्यवसाय सुरूच होता. त्यामुळे तो राज्य उत्पादन शुल्कच्या अधिनियमानुसार 'हातभट्टीवाला' व्यक्ती बनल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्याविरोधात राज्य उत्पादन शुल्कने एमपीडीएअंतर्गत कारवाईसाठीचा प्रस्ताव कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे सादर केला होता.   

त्या प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मदने याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने त्याला येरवडा कारागृहाच्या ताब्यात दिले आहे. 

कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक रविंद्र आवळे, उपअधीक्षक आर. एल. खोत यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर भरारी पथकाचे निरीक्षक पी. आर. पाटील, अशोक साळोखे, दुय्यम निरीक्षक विजय नाईक, जी. बी. कर्चे, वर्षा पाटील, सुखदेव सिद, विशाल भोई, राजेंद्र कोळी, सचिन लोंढे, मारूती पवार, साजिद मुल्ला आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

दरम्यान कारवाई करूनही सातत्याने तेच ते गुन्हे करणाऱ्यांविरोधात यापुढेही एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे अधीक्षक रविंद्र आवळे यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.