Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्लामुंबई : खरा पंचनामा

पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी १९८८ च्या बॅचच्या रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजप-शिवसेनेची सत्ता असताना २०१९ मध्ये नवीन सरकार स्थापन होण्याच्या काळात राजकीय नेत्यांचे फोन टेपिंग केल्या प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात एक पुण्यात तर दुसरा मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी रश्मी शुक्ला यांचे बहिण भावाचे नाते आहे. त्यातूनच त्यांनी गोपनीय अहवाल लिक केल्याचाही त्यांच्यावर आण्यात आला होता. पुण्याच्या पोलीस आयुक्त प्रांनी बेकादेशीरपणे फोन टॅपिंग केल्याचा आरोप केला गेला. २०१९ मध्ये महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर रश्मी शुक्ला केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांची सीआरपीएफएमच्या महासंचालक म्हणन हैदराबाद येथे नियुक्ती करण्यात आली होती.

रश्मी शुक्ला या राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त असताना एकनाथ खडसे, संजय राऊत, नाना पटोले, आशिष देशमुख, बच्चु कडू यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्याची विधानसभेतही माहिती दिली होती.

महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर शिंदे सरकार सत्तेवर आले. त्यात देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री व उपमुख्यमंत्रीपदी आले. त्यानंतर या गुन्ह्यात उलटफेर झाले. पोलिसांनी हे गुन्हे बंद करण्याची शिफारस केली होती. दोनच महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास बंद करण्यास परवानगी दिली. त्यामुळे त्यांची पोलिस महासंचालकपदी नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.