Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

फडणवीसांच्या ताफ्यात घुसला मराठा आंदोलक काळा झेंडा दाखवत 'गो बॅक'ची घोषणाबाजी

फडणवीसांच्या ताफ्यात घुसला मराठा आंदोलक
काळा झेंडा दाखवत 'गो बॅक'ची घोषणाबाजी



बदनापूर : खरा पंचनामा

येथील आ. नारायण कुचे यांनी आयोजित केलेल्या श्रीराम कथा व अखंड हरिनाम सप्ताहला आज सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वे राज्यमंत्री खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी भेट दिली.

हा कार्यक्रम आटोपून जालन्याकडे परत जात असताना एक मराठा आंदोलक उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या ताफ्यासमोर आला. काळा झेंडा दाखवून 'देवेंद्र फडणवीस, गो बॅक' अशा घोषणा यावेळी या आंदोलकाने दिल्या. त्याला बंदोबस्तावरील महिला पोलिसाने ताब्यात घेतले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.