Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'खुशाली' देऊन 'क्रीम पोस्टिंग' घेतलेल्यांचे देव पाण्यात! राज्य उत्पादन शुल्कमधील अनेकजण चिंतेत

'खुशाली' देऊन 'क्रीम पोस्टिंग' घेतलेल्यांचे देव पाण्यात!
राज्य उत्पादन शुल्कमधील अनेकजण चिंतेत



मुंबई : खरा पंचनामा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा पहिल्यांदाच राज्य उत्पादन शुल्कमधील अधिकाऱ्यांच्या बदली तसेच पदस्थापनेबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यामुळे एक किंवा दोन वषापूर्वी खुशाली देऊन बदली करून 'क्रीम पोस्टिंग' घेतलेल्या अधिकाऱ्यांनी आता देव पाण्यात घातले आहेत. आयोगाच्या सूचनेनुसार आयुक्तांनी मागवलेल्या माहितीमुळे राज्य उत्पादन शुल्कमधील अनेकजण सध्या चिंतेत असल्याचे चित्र आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आयुक्त कार्यालयाकडून विभागीय उपायुक्त आणि अधीक्षक यांच्या स्तरावरील बदली तसेच पदस्थापनेबाबत माहिती मागवली होती. त्याची मुदत कालच संपली आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्कमधील बदलीपात्र अधिकाऱ्यांच्या बदल्या लवकरच होणार असल्याचे संकेत आहेत. बदल्यांच्या निकषामुळे आपली बदली होईल का अशी चिंता आता उत्पादन शुल्कमधील अधिकाऱ्यांना वाटत आहे. 

आयुक्त कायार्लयातर्फे देण्यात आलेल्या सूचनांनुसार दुय्यम निरीक्षक आणि त्यावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. त्यामध्ये संबंधित अधिकारी स्वतःच्या जिल्ह्यात कार्यरत असल्यास, महसूली जिल्ह्यात तीन वर्षाचा सेवा कालावधी पूर्ण केला असल्यास, तीन वर्षाचा सेवा कालावधीची गणना करत असताना त्याच जिल्ह्यात पदोन्नती झाली असल्यास त्या सेवा कालावधीचा समावेश करण्यात यावा असेही म्हटले आहे.  

गेल्या अडीच वर्षात राज्य उत्पादन शुल्कमधील अनेक अधिकाऱ्यांनी खुशाली देऊन पाहिजे ती 'क्रीम पोस्टिंग' घेतली आहे. निवडणूक काळात बदली होणार नाही असे गृहीत धरून खुशाली दिलेले चिंतेत आहेत. यापूर्वी निवडणूक काळात शक्यतो उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नव्हत्या. मात्र यावेळी उत्पादन शुल्क विभागही बदल्यांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे अधीक्षकांपासून दुय्यम निरीक्षकांपर्यंत बदलीसाठी खुशाली देणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे आता जाहीर होणाऱ्या बदल्यांकडे संबंधितांचे डोळे लागले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.