Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मोहोळच्या हत्येचा महिन्यापूर्वी प्लान; पोळेकर फक्त प्यादं, मास्टरमाईड 'मामा'

मोहोळच्या हत्येचा महिन्यापूर्वी प्लान; पोळेकर फक्त प्यादं, मास्टरमाईड 'मामा'



पुणे : खरा पंचनामा

कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याची पुण्यात भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. शरद मोहोळ याच्या लग्नाच्या वाढदिवशी घराजवळ कोथरुडच्या सुतारदरा भागात त्याच्यावर गोळीबार करण्यात आला.

गोळीबारानंतर मोहोळला लगेचच जवळच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण उपचारार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्या साथीदाराने त्याचा गेम वाजवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर याचं नाव समोर आलं होतं. मात्र, आता पहिल्यांदाच यामागचा मास्टरमाईड समोर आलं आहे.

कुख्यात गँगस्टर शरद मोहोळच्या हत्येच्या आरोपांत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आठ जणांना सातारा रस्त्यावरील शिरवळ जवळून अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन पिस्टल हस्तगत करण्यात आलेत. मुठा खोऱ्यातील गुन्हेगारी वर्चस्ववादातून हा खून झाला असल्याचं आरोपींच्या प्राथमिक तपासातून समोर आलंय. नामदेव कानगुडे उर्फ मामा हा या हत्येचा मास्टरमाईड असून अतिशय नियोजनबध्द रित्या पोळेकरसह दोन जणांना मोहोळ टोळीत महिनाभर आधी घुसवून ही हत्या करण्यात आली.

शरद मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोळीबार केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. याप्रकरणी पोलीस मुन्ना पोळेकर आणि इतर हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. दुसरीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद मोहोळ याच्यावर त्याच्याच साथीदाराने हल्ला केल्याची
प्रतिक्रिया दिली आहे. धक्कादायक म्हणजे शरद मोहोळचा खून करणारा मुन्ना कोळेकर महिन्याभरापासून शरद मोहोळकडेच काम करत होता. टोळीचा सदस्य म्हणून तो त्याच्या सोबत होता. पैशांच्या देवाणघेवाणीतून दोघांमध्ये वाद उडाला होता. आजही सकाळपासून ते सोबत असल्याची माहिती मिळाली आहे.

जमिनीच्या वादावरून आठ दिवसांपूर्वी पोळेकर आणि शरद मोहोळ याची बाचाबाची झाली होती, त्याच वादातून हा खून करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुळशी तालुक्यातील मुठा हे शरद मोहोळ याचं गाव आहे, त्याच्याच आसपास पोळेकरची जमीन आहे. या जमिनीच्या खरेदी विक्रीवरून वाद सुरू होते. काही दिवसांपूर्वी शरद मोहोळने मुन्ना पोळेकरला बोलवून त्याला या प्रकरणात मारहाणही केली होती, त्याचाच राग धरून पोळेकरने शरद मोहोळची हत्या केली आहे, असं सांगितलं जातंय. मात्र, आता ही हत्या वर्चस्ववादातून झाली असल्याची माहिती पुढे आली आहे. पोळेकर हे फक्त प्यादं असल्याचंही यावरुन दिसत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.