Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिसाला मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर भाजप आमदार सुनील कांबळेवर गुन्हा दाखल

पोलिसाला मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर भाजप आमदार सुनील कांबळेवर गुन्हा दाखल



पुणे : खरा पंचनामा

सुनील कांबळे यांच्या दादागिरीचा प्रकार पुणे शहरात शुक्रवारी पुन्हा घडला. ससून रुग्णालयातील कोनशिलेवर नाव नसल्याच्या कारणावरुन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यास मारहाण केली.

त्यानंतर व्यासपीठावरुन उतरल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. माध्यमांमध्ये बातम्या आल्या. विरोधकांनी टीका केली. त्यानंतर अखेर सुनील कांबळे यांच्यावर रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.

भाजप आमदार सुनील कांबळे यांना पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलणे भोवले. सुनील कांबळे यांच्याविरोधात बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या आणि विरोधकांकडून सुरु झालेल्या टीकेनंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. ससून रुग्णालयाच्या कार्यक्रमात आमदार सुनील कांबळे यांनी मारहाण केलेले पोलीस कर्मचारी शिवाजी सरक असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

ससून रुग्णालयातील तृतीय पंथीय वार्डाचे उद्घाटन कार्यक्रम शुक्रवारी होता. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे, आमदार रवींद्र धंगेकर, आमदार सुनील कांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुणे भाजपचे आमदार सुनील कांबळे यांचे नाव कोनशिले नव्हते. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशीही वाद घातला. मी स्थानिक आमदार असूनही माझे नाव जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जितेंद्र सुरेश सातव यांना मारहाण केली. मग व्यासपीठावरुन उतरल्यावर पोलीस कर्मचारी शिवाजी सरक यांच्या गालात मारले.

दरम्यान या प्रकररणात आमदार सुनील कांबळे यांनी स्पष्टीकरण दिले. आपण फक्त त्या व्यक्तीला ढकलले. कोणालाही मारहाण केली नाही. कानाखाली वाजवली नाही. माझे आयुष्य झोपडपट्टीत गेले आहे. कानाखाली कशी वाजवतात, हे मला चांगलेच माहिती आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.