Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मराठा समाजाने पीएम मोदींविरोधात शड्डू ठोकला वाराणसीतून 1 हजार उमेदवारी अर्ज दाखल करणार

मराठा समाजाने पीएम मोदींविरोधात शड्डू ठोकला
वाराणसीतून 1 हजार उमेदवारी अर्ज दाखल करणार



परभणी : खरा पंचनामा

गेल्या काही दिवसांपासून मराठा समाज महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात प्रत्येक गावातील दोन उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे.

उमेदवारीवरुन बीड, नांदेड अशा प्रत्येक जिल्ह्यातही बैठका पार पडल्या होत्या. दरम्यान, आता परभणीतील बैठकीत मराठा समाजाकडून महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत. मराठा समाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात शड्डू ठोकण्याच्या तयारी आहे. कारण वाराणसी मतदारसंघात देखील परभणीतील मराठा समाज 1 हजार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहे. याबाबत मराठा समाजकडून ठराव मंजूर करण्यात आलाय. 

परभणी शहरातील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात आज परभणीतील मराठा समाजाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला विविध संघटनाचे पदाधिकारी, मराठा बांधव मोठ्या संख्येने उपास्थित होते. यावेळी जिल्ह्यातून एक हजार मराठा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकल मराठा समाजाकडून आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी परभणीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. वाराणसी पाठोपाठ राहुल गांधी, बारामती आणि ठाणे या चार मतदार संघात मराठा समाज बांधव उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. येणाऱ्या दिवसात राजकारणासाठी गाव बंदी पाठोपाठ घर बंदी करण्याचा ठराव ही मंजूर करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.