Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पाच हजाराची लाच घेताना पोलीस शिपाई रंगेहाथ सापडला

पाच हजाराची लाच घेताना पोलीस शिपाई रंगेहाथ सापडला



अक्कलकोट : खरा पंचनामा

मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्याची लाच घेणाऱ्या अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

दादासाहेब श्रीमंत बोडके (वय ३२, नेमणूक अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण रा. रुम नंबर ४४, जुनी पोलीस लाईन, डी. वाय. एस. पी ऑफीसच्या पाठीमागे, अक्कलकोट, जि. सोलापूर) असे त्या पोलिसाचे नाव आहे. 

यातील तक्रारदार हे वापरत असलेला मोबाईल चोरीचा असल्याचे सांगून, तक्रारदार यांचे विरुध्द मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्याकरिता यातील आलोसे दादासाहेब बोडके यांनी तक्रारदार यांचेकडे ५००० रुपये लाचेची मागणी करून सदरची लाच रक्कम स्वतः स्विकारले वरुन रंगेहात पकडण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.