कल्याणीनगर अपघात प्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांचं निलंबन
पुणे : खरा पंचनामा
पुण्यातील कल्याणीनगर भागातील अपघात प्रकरणात पोलिसांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. येरवडा पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. येरवड्यातील पोलीस निरीक्षक आणि पोलीस वरिष्ठ निरीक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
अपघाताबाबतची माहिती वरिष्ठ आधिकारी आणि कंट्रोल रूमला न दिल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातानंतर राज्यातील राजकारण देखील तापलं आहे. राज्यातील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर या अपघातानंतर आरोप केले होते. त्यानंतर या प्रकरणात आता निलंबनाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. हा अपघात झाल्यानंतर त्याची माहिती वरिष्ठांना आणि कंट्रोल रूमला न कळवल्याने मोठी कारवाई केली आहे.
येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही असा ठपका ठेवत दोघांचे निलंबन करण्यात आलं आहे.
पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी अशी या दोघांची नावं आहेत, तपासात दिरंगाई केल्याचा आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही असा ठपका ठेवत या दोघांचे निलंबन करण्यात आलं आहे. निलंबित करण्यात आलेले दोन्ही अधिकारी हे येरवडा पोलिस ठाण्यातील असून अपघात झाला त्या रात्री हे दोघे त्या ठिकाणी ड्युटीवर होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.