सांगली दर्पणचे संपादक विकास गोंधळे यांना 'आरोग्य सेवक' सन्मानपत्र प्रदान
सांगलीतील सुभाष चौक गणेशोत्सव मंडळातर्फे आ. विश्वजित कदम यांच्याहस्ते गौरव
सांगली : खरा पंचनामा
सांगलीतील सुभाष चौक गणेशोत्सव मंडळातर्फे वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल साप्ताहिक सांगली दर्पणचे संपादक विकास गोंधळे यांचा माजी मंत्री, आ. विश्वजित कदम यांच्याहस्ते 'आरोग्य सेवक' सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कॉंग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मंडळाचे आधारस्तंभ माजी नगरसेवक मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते संजय बजाज, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, रणजित पाटील सावर्डेकर, महेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. गोंधळे यांनी १९९३ पासून वृत्तपत्र क्षेत्रात सेवा सुरू केली. दैनिक जनप्रवास, नवाकाळ, पोलिसवाणी, संचार या दैनिकांचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केले. पत्रकारिता क्षेत्रात काम करत असतानाच वैद्यकीय क्षेत्रात गरीब, गरजू रूग्णांना मदत करण्याचे काम अखंडपणे सुरू आहे. महापूर, कोरोनासारख्या आपत्तीच्या काळातही जीवाची पर्वा न करता गोंधळे यांची रूग्णसेवा सुरू होती. सांगली आणि मिरजेतील सिव्हील हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या गरीब, गरजू रूग्णांना आजही ते मदत करत असतात असे या सन्मानपत्रात म्हटले आहे.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील कोरे, मंदार चौगुले, अथर्व कराडकर, अभिजित शिंदे, पृथ्वी डुबल, अथर्व पवार, जोयेश मुजावर, संदीप मोरे, आकाश वाघ आदींनी संयोजन केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.