'प्रसाद बनवताना भेसळ झाली नाही!'
तिरुपती लाडू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्र्यांना सुनावले खडेबोल
नवी दिल्ली : खरा पंचनामा
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारच्या काळामध्ये तिरुपती देवस्थानच्या लाडू प्रसादामध्ये जनावरांची चरबी आणि माशांच्या तेलाचा वापर होत होता, असा आरोप विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता. त्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली.
तिरुपती लाडू प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण सुरु आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना कोर्टाने चांगलेच फटकारले असून सरकारवर ताशेरे ओढले आहेत. सुप्रीम कोर्टाने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्याना सुनावले खडेबोल सुनावत म्हटलं की, लाडू प्रसाद तपासाचा निकाल न येताच माध्यमांमध्ये निवेदन देण्याची काय गरज होती ? देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे.
कोर्टाने पुढे म्हटलं की, अहवाल पाहता प्रथमदर्शनी असे दिसते की प्रसाद बनवताना भेसळयुक्त सामग्री वापरली गेली नव्हती. या प्रकरणी SIT ने कुठपर्यंत तपास केला? यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून जबाबदारीची अपेक्षा आहे.
सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं : लाडू प्रसाद प्रकरणाचा अहवाल जुलैमध्ये आला मग सप्टेंबर महिन्यात त्यावर भाष्य का? तुम्हीच आशी विधान करत असाल तर मग तपासाची काय गरज ?
या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने गठित केलेल्या SIT मार्फत केला जाईल की अन्य दुसऱ्या एजन्सीकडे सोपवला जाईल, यावर कोर्ट गुरुवारी आपला आदेश देण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.