"'अमृता' हून ही गोड नाव तुझं देवा"
मुंबई : खरा पंचनामा
विधानसभेच्या अध्यक्षपदी आज राहुल नार्वेकर यांची निवड झाली. यावेळी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतोद रोहित पाटील यांनी पहिलंच भाषण केलं.
रोहित पाटील सभागृहातील सर्वात तरुण आमदार आहेत. त्यामुळे रोहित पाटील भाषण करत असताना सभागृहातील सगळे आमदार चिडीचूप शांत बसल्याचे पाहायला मिळाले.
बाबासाहेब आंबेडकर यांनी जो आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. जसा तुम्ही तरुण अध्यक्ष आहात तसं मी ही तरुण आमदार आहे. एक नंबरच्या वकिल यांच्याकडे जसं लक्ष असत तसं माझ्याकडे ही असूद्या कारण मी ही वकिली पुर्ण करतोय. सर्वसामान्य लोकांच्या हिताचं आवाज याकडे तुम्ही लक्ष द्या..., अशी मागणी रोहित पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमचंही अभिनंदन... यावेळी रोहित पाटील यांनी एक वाणी बोलावून दाखवली. 'अमृता' हून ही गोड नाव तुझं देवा असं संतांनी म्हटलं आहे. त्यामुळे तुम्ही ही गोड वागणुक तुम्ही आम्हाला द्यावी, अशी देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्याकडे विनंती करतो, असं रोहित पाटील म्हणाले. रोहित पाटील अमृताहूनही गोड नाव तुझं देवा, असं म्हटल्याने देवेंद्र फडणवीसांनाही हसू आले. कारण देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीचं नाव अमृता फडणवीस आहे. यानंतर मी मुद्दाहून अमृताहून असं म्हटलं, अशी थेट गुगली रोहित पाटील यांनी टाकली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.