रेल्वे स्थानक परिसरातून दुचाकी चोरणाऱ्यास अटक
विश्रामबाग पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून दुचाकी चोरणाऱ्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली.
लहु बाबासाहेब कदम (वय ३५, रा. बेलवाडी ता. वडवणी जि. बीड सध्या रा. बोरगांव ता. वाळवा जि. सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. रेल्वे स्थानक परिसरातून दि. 18 जानेवारी रोजी दुचाकी चोरीला गेल्याची फिर्याद सचिन सावंत (रा. मिरज) यांनी दिली होती. यातील चोरट्याला पकडण्याच्या सूचना निरीक्षक भालेराव यांनी सहायक निरीक्षक चेतन माने यांना दिल्या होत्या. माने यांचे पथक शोध घेत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे कदम याला बार्शी येथे पकडले.
त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने ती दुचाकी (एम एच 10 डी एक्स 6491) सांगलीतील रेल्वे स्थानक परिसरातून चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करून दुचाकी जप्त करण्यात आली.
विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक चेतन माने, संदिप साळुंखे, बिरोबा नरळे, योगेश पाटील, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी, मुलाणी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.