"धावपळ होत असल्यानं केस लढू इच्छित नाही"
अक्षयच्या पालकांची कोर्टाला विनंती
मुंबई : खरा पंचनामा
बदलापूर शाळेतील अत्याचार प्रकरणातील कथित आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरप्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. अक्षयच्या कुटुंबियांनी खूपच धावपळ होत असल्यानं आपणं आता केस लढू इच्छित नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. या केसची पुढची सुनावणी उद्या पार पडणार आहे.
अक्षय शिंदेंच्या आई-वडिलांनी आपण केस लढू शकत नसल्याचं म्हटलंय. आमच्यावर कुठलाही दबाव नाही मात्र धावपळ जमत नसल्यानं केस लढू शकत नसल्याचं अक्षयच्या पालकांनी म्हटलं आहे.
अक्षयला पोलिसांच्या व्हॅनमधून कोर्टात नेत असताना पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला होता. त्यानं पोलिसांची बंदुक हिसकावल्यानं स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या, असं एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांनीच सांगितलं होतं. पण या घटनेची न्यायालयीन चौकशी झाल्यानंतर हे फेक एन्काऊटर असल्याचं सष्ट झालं होतं.
त्यानंतर आता ही केसच बंद करण्याची विनंती अक्षय शिंदेंच्या पालकांनी पोलीस प्रशासनाला केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.