Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाला आली जाग! उत्कृष्ट गुन्हे अन्वेषणसाठी बक्षीसांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी मुंबईत बोलावली बैठक 'खरा पंचनामा'च्या बातमीची दखल घेत मागवले प्रस्ताव

अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाला आली जाग!
उत्कृष्ट गुन्हे अन्वेषणसाठी बक्षीसांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी मुंबईत बोलावली बैठक 
'खरा पंचनामा'च्या बातमीची दखल घेत मागवले प्रस्ताव 



सांगली : खरा पंचनामा 

राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेतली जात नसल्याबाबत तसेच विभागाच्या उदासीनतेबाबतही 'खरा पंचनामा'ने दि. 27 जानेवारी रोजी वृत्त दिले होते. या वृत्ताची दखल घेत राज्य उत्पादन शुल्कच्या सह आयुक्तानी गुरुवार दि. 6 फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व विभागीय उप आयुक्तांची बैठक बोलावली आहे. तसेच बक्षीसांबाबतचे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना सर्व विभागीय आयुक्त आणि अधिक्षकांना दिल्या आहेत.


राज्य उत्पादन शुल्कचे सह आयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या सहीने याबाबतच्या सूचना संबंधिताना ईमेलद्वारे देण्यात आल्या आहेत. दि. 22 जानेवारी रोजी सांगलीचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाने मिरजेचे निरीक्षक दीपक सुपे यांच्यासह त्यांच्या पथकाने महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश बनावटीची दारू पकडून तब्बल 68 लाखांचा मुद्देमाल पकडून दोघांना अटक केली होती. ही सांगली जिल्ह्यातील गत काही वर्षातील मोठी कारवाई आहे. या कारवाईसाठी निरीक्षक दीपक सुपे यांचा मिरजेतील गांधी चौक मंडळाने प्रजासत्ताकदिनी सत्कार केला होता. मात्र या कामगिरीची प्रशासनाकडून दखल घेतली नव्हती. प्रजासत्ताकदिनी पोलीस, महसूल तसेच अन्य शासकीय विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा पालकमंत्री चंदकांत पाटील यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. मात्र राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाईची दखल घेण्यात आली नव्हती अशा आशयाची बातमी 'खरा पंचनामा'ने दिली होती.

या बातमीची दखल घेत राज्य उत्पादन शुल्कचे सह आयुक्त श्री. सुर्वे यांनी दि. 31 जानेवारी रोजी उत्कृष्ट गुन्हे अन्वेषण करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचे प्रस्ताव तातडीने पाठवण्याच्या सूचना केल्या होत्या. आज मंगळवारपर्यंत ते प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. निधी अभावी तसेच प्रशासकीय कारणास्तव प्रलंबीत प्रस्तावांचा आढावा घेण्यासाठी राज्यातील सर्व विभागीय उप आयुक्तांची बैठक गुरुवार दि. 6 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे बोलावण्यात आली आहे.

त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागातील उत्कृष्ट गुन्हे अन्वेषण करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना मिळणाऱ्या बक्षीसांचा मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे चांगले काम करनाऱ्यांचे मनोबल वाढून त्यांच्याकडून आणखी उत्कृष्ट कामगिरी होईल. यामुळे शासनाच्या महसूलातही वाढ होण्यास मदत होणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.