नीलम गोऱ्हे यांच्या माजी ओएसडीसह तिघांवर गुन्हा
मुंबई : खरा पंचनामा
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांच्या माजी ओएसडीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरीतील तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. या तिघांनी 6.50 लाख रुपये उकळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आरोग्य खात्यात नोकरी देण्याच्या बहाण्याने रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणाकडून जवळपास 6.50 लाख रुपये उकळण्यात आल्याच आरोप आहे. शनिवारी माहीम पोलिसांनी गुन्हा नोंदवला. सचिन चिखलीकर, चारुदत्त तांबे, तेजस तांबे अशी आरोपींची नावे आहेत. त्यापैकी सचिन मंत्रालयात ओएसडी म्हणून नियुक्त होता, तर फसवणूक झालेला तरुण निवृत्त पोलिसाचा मुलगा आहे.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्ह यांच्यासोबत आरोपी सचिन हा 2021 मध्ये रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी आला होता. त्यावेळी तरुणाच्या कुटुंबीयांनी त्याची भेट घेतली. आरोग्य खात्यात लिपिक म्हणून नोकरी मिळवून देण्यासाठी त्याने दोन लाख स्वीकारले होते. मात्र आरोग्य खात्यातील रिक्त पदांसाठी होणारी परीक्षा रद्द झाल्यानंतर सचिनने या कुटुंबाची भेट तांबे यांच्याशी घडवली.
तांबे यांनी रेल्वेत, कृषी खात्यात नोकरी मिळवून देतो, असे सांगत तरुणाकडून 14 लाखांची मागणी केली. त्यापैकी 7 लाख रुपये आगाऊ घेण्यात आले. मात्र नोकरी मिळाली नसल्याने कुटुंबाने पैशांसाठ तगादा लावला. त्यातील अडीच लाख रुपये तांबेने परत केल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.