Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नंबर प्लेटच्या बहान्याने बनावट संकेतस्थळ तयार करून ऑनलाईन फसवणूक

नंबर प्लेटच्या बहान्याने बनावट संकेतस्थळ तयार करून ऑनलाईन फसवणूक



पुणे : खरा पंचनामा 

प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) निर्देशानुसार शहरातील २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना आधुनिक तंत्रज्ञानयुक्त उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट - एचएसआरपी) बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे.

३० एप्रिलपूर्वी एचएसआरपी बसवावी लागणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. मात्र सायबर चोरट्यांनी ही बाब हेरून काही बनावट संकेतस्थळ तयार करून फसवणूक केल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. तर, ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच प्रक्रिया करावी असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

३० एप्रिल २०२५ पूर्वी राज्यातील २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना 'एचएसआरपी' बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने राज्यभरातील आरटीओ कार्यालयांची विभागणी तीन झोनमध्ये करण्यात आल्याने उच्च सुरक्षा क्रमांक पाटी बसवण्याचे कामकाज सुलभ पद्धतीने व वेगाने होणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाचे वर्गीकरण झोन एकमध्ये करण्यात आले आहे. पुण्यासह झोन एकमधील कार्यालयांसाठी 'रोझमार्टा सेफ्टी सिस्टिम' ची अंमलबाजवणी ऐजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी या एजन्सीकडून ६९ फिटमेंट सेंटरला परवानगी देण्यात आली आहे. वाहनधारकांनी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना या सेंटरच्या माध्यमातून प्रत्यक्ष नंबरप्लेट बसवून दिली जाणार आहे.

एचएसआरपी बसवून घेण्यासाठी केवळ दोन महिने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे अनेक वाहनधारक आता युद्धपातळीवर ही प्रक्रिया करीत आहेत. याचा फायदा आता सायबर चोरटे घेत आहे. नामसाधर्म्य असलेले ऑनलाईन संकेतस्थळ सुरू करून त्याद्वारे नागरिकांची फसवणूक केली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.