"फडणवीसांकडे बघून बाण आणि घड्याळाला मतं"
बीड : खरा पंचनामा
मागील काही दिवसांपासून भाजपचे आमदार सुरेश धस हे चांगलेच चर्चेत आले आहेत. महादेव मुंडे आणि संतोष देशमुख हत्याप्रकरणामध्ये त्यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. सातत्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत असताना त्यांनी अचानक मुंडेंची भेट घेतली.
त्यामुळे त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका केली जात आहे. अशातच आता त्यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. "विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर भाजपच्या सर्वात जास्त जागा निवडून आल्या, सोबत घड्याळ आणि बाणालाही लोकांनी मत दिलं. नाहीतर आमच्या लोकांनी घड्याळाला मत दिली असती का?", असा सवाल धस यांनी उपस्थित केला.
"बाणाची आणि आमची जुनी दोस्ती. पण एकनाथ शिंदे यांचा बाणही लोकांनी निवडून दिला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्रात कार्यकर्ते सांभाळणारा नेता जर कोणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत," असेही धस यावेळी म्हणाले.
"विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांचा बाण आणि अजित पवार यांच्या घड्याळाला देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी निवडून दिले आहे," असा दावा आता सुरेश धस यांनी केला आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सुरेश धस यांच्या विधानसभा निवडणुकीबाबतच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चेला उधाण आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.