"मस्ती कराल तर घरी जाल, आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात"
मुंबई : खरा पंचनामा
राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत. कोर्टाने त्यांना एका प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
कोकाटे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणीही विरोधकांकडून होत आहे. कोकाटेंवर राजकीय संकट ओढवलेलं असतानाच त्यांनी एक विधान करून राज्य सरकारच्या कारभारावरच बोट ठेवलं आहे. आमचे ओएसडी आणि पीएस सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री ठरवतात, आमच्या हातात काहीच नाही, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका कार्यक्रमाला संबोधित करताना महायुतीचा फॉरमॅटचा मांडला. पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला. माझ्यासह तुमच्या कुणाच्या जाण्यामुळे सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल. डिपार्टमेंटचं काम शिस्तीत झालं पाहिजे. 100 दिवसांचा कार्यक्रम दिला. आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात. आमच्या हातात काहीच राहिलं नाही. त्यामुळे आम्हाला काम करावंच लागेल. पण आपणही नीट काम करा. म्हणजे सरकार आणि आपली सांगड बसली पाहिजे. त्यामुळे समाजात एकप्रकारचं स्थैर्य निर्माण होईल, असं माणिकराव कोकाटे म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.