Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एवढं काम करूनही वाटेला फक्त बदनामी! संतोष देशमुख प्रकरण : एलसीबीच्या पोलिस हवालदाराची भावूक पोस्ट

एवढं काम करूनही वाटेला फक्त बदनामी! 
संतोष देशमुख प्रकरण : एलसीबीच्या पोलिस हवालदाराची भावूक पोस्ट



बीड : खरा पंचनामा 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने फक्त बीडच नव्हे तर राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 77 दिवस उलटून गेले आहेत. या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. पोलिसाकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. तर, दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबाबत या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. तर, दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबाबत अनेकांकडून शंका व्यक्त केल्या जात आहेत. 

या दरम्यान पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नावाने आरोप केले जात आहेत. यातीलच एक असलेल्या पोलीस हवालदार भागवत शेलार यांनी सोशल मीडियातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

या प्रकरणात सुरुवातीपासून पोलीस तपासावर शंका उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचे पोलिसांशी असलेल्या संबंधावरून हे आरोप करण्यात आले होते. तर, दुसरीकडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी आणि सीआयडीने सुरू केला. त्यानंतरही अनेक शंका उपस्थित करण्यात येत आहे. यावर तपासातील पोलीस कर्मचारी भागवत शेलार यांनी सोशल मीडियातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भागवत शेलार यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनाच थेट सवाल केला आहे. काम करूनही बदनामी मिळाली की काय त्रास होतो हे तुम्हाला कोण सांगणार? असा प्रश्न शेलार यांनी विचारलाय.

भागवत शेलार यांची सोशल मीडिया पोस्ट...
संतोष अण्णा भावपूर्ण श्रद्धांजली...
गेल्या 9/12/24 रोजी पासुन म्हणजे संतोष भैया देशमुख यांच्या हत्येच्या दिवसापासून रात दिवस मनात एकच विचार वरिष्ठांनी सांगितले आहे की काही झाले तरी शेलार आरोपी सापडले पाहिजेत......
आपल्या खात्याची होत असलेली बदनामी पिडीताला न्याय द्यायचा या उद्देशाने गेले (75) दिवस मनात एकच विचार आरोपी भेटले पाहिजेत.
ऊसात फिरलोत, नाली नदी फिरलोत, काट्या कुपाट्या बघितल्या नाही रात्री अपरात्री प्रवास करून थकलो तरी थांबलो नाहीत का तर डोळ्यासमोर एकच आपल्यावर वरिष्ठांनी विश्वास दाखवला आहे आरोपी भेटलाच पाहिजे.
सर्वच गोष्टी कायदेशीर मार्गाने नाहीत ० करता येत आणि मदत कोण करत • बोलायला नाव ठेवायला सर्वच येतात.
"परवा वडिलांचं मासिक असताना पण थांबता आले नाही का तर आरोपी शोध कामी मुंबई जाव लागलं मी म्हणू शकलो असतो सर वडिलांचे मासिक आहे पण नाही म्हणू शकलो का तर मला पहिल्या पासुन प्रकरण माहिती आहे आणि सरांना समोर निगेटिव्ह नको बोलायचे म्हणुन गप गेलो."
आरोपी पकडताना कोणाची तरी मदत घ्यावीच लागते (आणि ते आरोपीच्या जवळचे असले तर लवकर यश येते उद्देश फक्त आरोपी पकडणे असतो) आम्ही काही पिचर मधले पोलिस नाहीत की आम्हाला तिसरा डोळा आहे आणि लगेच दिसले की पकडले त्यासाठी लोकांवर विश्वास टाकावा लागतो (काही हरामखोर विश्वास घात करतात) त्यांचा विश्वास संपादन करावा लागतो आणि काम करतांना चुका ही होऊ शकतात....
याच्या बदल्यात काय मिळाले तर शेलार "वाल्मीक कराड" साठी काम करतो....
शेलार" सुरेश धस साहेब "यांचे साठी काम करतो...
अरे बाबांनो मी पोलिस खात्यासाठी काम करतो अन् पगार tax मधील पैशासाठी घेतो आणि काम करतांना वडिलांना (भाऊ) आठवतो की त्याचं नाव खराब नाही झाल पाहिजे...
गेल्या 75 दिवसात किती मेहनत घेतली, किती रात्रीच प्रवास केला आणि किती आर्थिक भार पडला हे माझ्या मनाला माहिती O... त्याच यश म्हणून 7 आरोपी मिळाले...
एवढा त्रास घेऊन काय भेटल तर फक्त बदनामी बायको मूल रोज बोलतात पपा तुमच नाव काम करून पण का T.V ला येत काय सांगु त्यांना किती मानसिक त्रास होत असेल मला प्रामाणिक काम करण्याचा, याचा विचार करावा...
मी काम करतो हे नक्कीच उपकार करत नाही त्याचा सरकार मला मोबदला देते पण जिथे ईमानदारी केली तेथे कौतुक नाही पण किमान ज्यात अर्ध माहिती घेऊन मानसिक त्रास देऊ नका एवढीच विनंती....
आज आमचे पोलिस निरीक्षक, Sdop साहेब, Asp साहेब, आणि S.P नवनीत साहेब हे आधार देतात म्हणून जीवात जीव आहे O नसता काम करून बदनामी मिळाली की किती त्रास होतो हे कोण सांगणार अंजलीताई तुम्हांला.....
आज ही S.P साहेब आणि आमचे प्रभारी यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे फरार आरोपीचा शोध घेत आहोत देव आम्हाला लवकर यश देवो.
संतोष अण्णा कोणी काही म्हणो तुम्हाला न्याय व्यवस्था नक्की न्याय देईल हा विश्वास आहे.

भागवत शेलार,
HC LCB Beed.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.