Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'त्या' निवृत्त पोलीस अधिकाऱ्यासह त्यांच्या 2 मुलांवर विनयभंगाचा गुन्हा

'त्या' निवृत्त पोलीस अधिकाऱ्यासह त्यांच्या 2 मुलांवर विनयभंगाचा गुन्हा



पुणे : खरा पंचनामा

बोअरवेलची गाडी गेल्याने रस्त्यावरील ड्रेनेजचे झाकण तुटल्याने ते दुरुस्त करुन देण्याच्या वादातून निवृत्त पोलीस अधिकार्याला टोळक्याने मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर आता दोन दिवसांनी या निवृत्त पोलीस अधिकार्यासह त्यांच्या दोन मुलांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवृत्त पोलीस उपनिरीक्षक गोरखनाथ एकनाथ शिर्के (वय ६५), निलेश गोरखनाथ शिर्के आणि नितेश गोरखनाथ शिर्के (सर्व रा. महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटी, फॉरेस्ट पार्क लोहगाव रोड, लोहगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत एका २८ वर्षाच्या महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वी गोरखानाथ शिर्के यांच्या घराचे काम चालू होते. त्यावेळी त्यांनी बोअरवेलची गाडी बोलावली होती. बोअर मारुन झाल्यावर ही गाडी जाताना सोसायटीतील सार्वजनिक रोडवरील ड्रेनेजचे झाकण तुटले. हे झाकण दुरुस्त करुन द्यावे अशी मागणी गोविंद कॅनल यांनी त्यांच्याकडे केली होती. त्यांनी त्यासाठी लागणारी रिंग आणून दिली होती. हे ड्रेनेजचे झाकण अगोदर तुटलेले होते, असे सोसायटीतील काही सभासदांचे म्हणणे होते. यावरुन त्यांच्यात वाद होता. ९ मार्च रोजी दुपारी दीड वाजता शिर्के यांच्या घरी गेले होते. यावेळी आपल्या घरात शिरुन सामानाची तोडफोड करुन मारहाण झाल्याची फिर्याद गोरखनाथ शिर्के यांनी दिली होती. त्यावरुन गोविंद कॅनल यांच्यासह ९ ते १० जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

त्या विरोधात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आम्ही शिर्के यांच्या घरी गेलो असताना त्यांनी मला ज्ञान शिकवण्याची आवश्यकता नाही, मी आधी पण सगळ्यांना सांगितले आहे की मी काही ते झाकण दुरुस्त करुन देणार नाही, यापुढे परत जर कोणी ते झाकण दुरुस्त करुन देण्याबाबत माझ्याकडे आले, तर विसरु नका, मी पोलीस खात्यात होतो, मला कायद्याचे संपूर्ण ज्ञान आहे, अशी अशी कलमे लावून तक्रार दाखल करुन असा ज्ञान आहे, अशी अशी कलमे लावून तक्रार दाखल करुन असा अडकविन, पूर्ण खानदान जेलमध्ये जाईल, अशी आपल्या पतीला धमकी दिली. ते आमच्या परिवाराच्या नावाने शिवीगाळ करु लागले. त्यांच्या आवाजाने त्यांची पत्नी संगीता शिर्के, मुले निलेश व नितेश शिर्के धावत बाहेर आली.

त्यांच्यापैकी एकाच्या हातामध्ये चाकू होता. दुसर्याच्या हातात दगड होता. त्यांच्यापासून माझ्या पतीला वाचविण्याच्या हेतूने निलेश व नितीन यांना अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु निलेश व नितीन शिर्के यांनी विनयभंग करण्याच्या हेतूने आमचा विनयभंग करुन खाली पाडले. माझ्या पतीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच पतीच्या उजव्या हातास चावा देखील घेतला. लोक जमा झाल्याने आम्हाला धमकावले की, पोलिसांमध्ये गेलास तर याद राख गाठ माझ्याशी आहे. खानदानासोबत मारुन टाकीन, अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक चेतन भोसले तपास करीत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.