विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर !
मुंबई : खरा पंचनामा
विधानसभा निवडणुकांनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. भाजपच्या तीन, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एक आणि शिवसेना शिंदे गटाच्या एका आमदारासाठी ही निवडणूक होणार आहे. या विधानपरिषदेच्या रिक्त जागांवर आता कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 27 मार्च रोजी विधानपरिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. महायुतीमधील भाजपचे 3, राष्ट्रवादी काँग्रेसचे 1 आणि शिवसेना शिंदे गटाची एक जागा रिक्त आहे. या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानपरिषदेवर असलेले भाजपचे आमदार, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड यांच्यासह शिवसेनेकडून आमशा पाडवी आणि अजित पवार गटाकडून राजेश विटेकर यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कुणाची लॉटरी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.