Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

उत्कृष्ट विभागीय उपआयुक्त बालस्नेही पुरस्काराने सुवर्णा पवार सन्मानित

उत्कृष्ट विभागीय उपआयुक्त बालस्नेही पुरस्काराने सुवर्णा पवार सन्मानित



मुंबई : खरा पंचनामा 

महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग अंतर्गत बालहक्क संरक्षण आयोग यांच्यामार्फत महाराष्ट्राच्या बालकांकरीता उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यामध्ये अनेक  जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी यांना सन्मानित करण्यात आले. महीला व बाल विकास विभाग अंतर्गत सुवर्णा पवार यांना कोकण विभागातून उत्कृष्ट उपायुक्त या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

सुवर्णा पवार या बालकांच्या क्षेत्रात अनेक वर्षापासून काम करीत असून महिला व बालविकास विभागामध्ये त्या उपायुक्त पदावर कार्यरत आहेत. त्यांनी अनाथ निराधार आणि निराश्रित बालकांसाठी उन्हाळी सुट्टीमध्ये  मामाच गाव ही अभिनव कल्पना राबवून मुलांसाठी उन्हाळ्यात शिबिरे आयोजित केली होती. सदर शिबिरांमध्ये कौशल्य विकास विविध प्रकारचे खेळ विविध प्रकारच्या करमणुकीचे कार्यक्रम यांच्या माध्यमातून जी मुले पूर्ण आनाथ आहेत संस्थेमधून  कधीही नातेवाईक किंवा  आपल्या घरी जाऊ शकत नाहीत. त्यांना मुंबईतील चिल्ड्रन्स एड सोसायटी या संस्थांमध्ये बोलवून आजोळसारखी मामाच्या गावा सारखी मजा करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. 

राजभवनात मुलांची सहल काढून मुलांना आनंदी ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले होते. त्यांच्या विभागातील इतर  सर्व प्रकारच्या प्रशासकीय कामाची दखल घेऊन त्यांना बालस्नेही पुरस्काराने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशिबेन शाहा व राज्यपाल यांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

या कार्यक्रमाला राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे, विधान परिषदेच्या सदस्या मनीषाताई कायंदे, व इतर मान्यवर उपस्थित होते. श्रीमती सुवर्णा पवार या साहित्यिक लेखिका कवयित्री असून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.