Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ड्रग्ज विकत घेणाऱ्या दोघांना मुंबईतून अटक; आतापर्यंत 9 जणांवर कारवाई एमडी ड्रग्ज प्रकरण : सांगली एलसीबीची कारवाई

ड्रग्ज विकत घेणाऱ्या दोघांना मुंबईतून अटक; आतापर्यंत 9 जणांवर कारवाई 
एमडी ड्रग्ज प्रकरण : सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा 
 
विट्याजवळील कार्वे (ता. खानापूर) येथील एमडी ड्रग्ज प्रकरणी ड्रग्ज विकत घेणाऱ्या आणखी दोघांना मुंबई येथून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.

मोहम्मद कय्युम अकबर अली शेख (वय ३६, रा. कुर्ला कमान, काजु पाडा, रुम नं. ९ आझाद चाळ, मुंबई), मोहम्मद इस्माईल सलीम खान (वय ४५, रा. कलीना डोंगर रुम नं. ६ शेडी हाजी चाळ, नूरी मस्जीदच्या समोर, सातांक्रुझ, (५) मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी यापूर्वी रहुदिप धानजी बोरिचा (वय ४१, रा. श्री रेसेडेन्सी, ररुम नं २२, उत्तीयादरा कोसंबा, ता. भरुच, जि. सुरत राज्य गुजरात), सुलेमान जोहर शेख, (वय ३२, रा. मौलाना दादा लेन, दर्गाह गल्ली, बांद्रा, वेस्ट मुंबई), बलराज अमर कातारी (वय २४, रा. साळशिंगे रोड, आयटीआय कॉलेज जवळ, विटा), जितेंद्र शरद परमार (वय ४१, रा. सुमंगल सोसायटी, बी विंग, फ्लॅट नं. २४, पहिला मजला, नागडोंगरी चेंडरे, ता अलिबाग, जि रायगड, सध्या रा रहेजा हॉस्पीटल जवळ, ताहिर बेकरीच्या वर, माहिम १६, मुंबई), अब्दुलरज्जाक अब्दुलकादर शेख (वय 53, रा रूम नं. १, उस्मानिया मस्दिचे बाजूला अल मोहमदिया वेलफेअर असोसिएशन, पाठणवाडी, फिल्डर पाडा, पवई मुंबई), सरदार उत्तम पाटील (वय ३४, रा. शेणे, ता वाळवा, जि सांगली), सौ. गोकुळा विठ्ठल पाटील (वय ४७, रा. भवानी मळा, पाटील वस्ती, विटा ता. खानापुर) यांना अटक करण्यात आली आहे.

कार्वे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावर एलसीबीच्या पथकाने छापा टाकला होता. त्यावेळी रहुदिप बोरिचा, सुलेमान शेख, बलराज कातारी या तिघांना दि. २७ रोजी अटक करण्यात आली होती. तेथून २९ कोटी रूपयांचे १४ किलो ५०० ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. 

एलसीबीने तिघांची कसून चौकशी केली. तेव्हा आणखी जितेंद्र परमार, अब्दुलरज्जाक शेख, सरदार पाटील यांची नावे निष्पन्न झाली. यातील परमार याने कारखाना सुरु करण्यासाठी आर्थिक मदत केली होती. तर पाटील मार्गदर्शन करत होता. शेख याने मुंबईत ड्रग्ज विक्रीची जबाबदारी घेतली होती.

या सहाजणांची मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात ओळख झाली होती. सहाजणांनी जामिनावर मुक्त झाल्यानंतर एकत्र येऊन एमडी ड्रग्जचा कारखाना सुरू करण्याचे ठरवले. त्यानुसार रहुदिप याने दिल्ली येथून मशिनरी मागवली. सुलेमान शेख याने दिल्लीतील कंपनीस पैसे पाठवले. त्यानंतर दोघांनी बलराजच्या मदतीने विटा येथे मशिनरी बसवली. मशिनरी बसवण्यासाठी जितेंद्र याने आर्थिक मदत केली. सरदार पाटील याला ड्रग्ज विषयी माहिती असल्यामुळे त्याने दोन-तीनवेळा येथे येऊन मार्गदर्शन केले. तर बलराज हा अब्दुलरज्जाक शेख याला पुणे, मुंबईत जाऊन माल देत होता. जितेंद्र, अब्दुलरज्जाक व सरदार या तिघांना फलटण येथून ताब्यात घेण्यात आले. या संशयितांकडे कसून चौकशी केल्यावर मुंबईत ड्रग्ज विक्री करणाऱ्या शेख आणि खान यांना पथकाने अटक केली. त्यांना न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मार्गदर्शनाने एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक पंकज पवार, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, सागर लवटे, नागेश कांबळे, अमर नरळे, सतिश माने, महादेव नागणे, संदीप नलवडे, उदय माळी, विक्रम खोत, सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.