लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून महिलादिनाचं गिफ्ट
मुंबई : खरा पंचनामा
महिला दिनानिमित्त ८ मार्चला राज्यातील लाडक्या बहिणींना राज्यसरकारकडून खास गिफ्ट देण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन हप्ते एकत्र म्हणजेच ३ हजार रूपये मिळणार आहेत. सोमवारी विधीमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली आहे. यादरम्यान माध्यमांशी बोलताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, लाडकी बहिण योजनेवरून विरोधक सुरूवातीपासूनच आरोप करत आले आहेत. गेल्या महिन्यात जवळपास २ कोटी ४० लाख महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाला आहे. फेब्रुवारी महिन्यातही तसाच लाभ मिळणार आहे. विरोधकांना ही योजना खुपते. या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांमध्ये नैराश्य पसरले आहे. पण कोणत्याही परिस्थीतीत ही योजना सुरू राहणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
लाडक्या बहिणींना ८ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे हप्ते मिळणार आहेत. ५ मार्चपासून प्रक्रिया सुरू होणार असून ८ मार्चपर्यंत बँक खात्यात पैसे जमा होतील, असेही तटकरे यांनी यावेळी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.