सांगलीच्या बंटी-बबलीला अटक : ३ गुन्हे उघड
दागिन्यासह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
मंगळवेढा : खरा पंचनामा
मंगळवेढा पोलिसांनी सांगली जिल्ह्यातील चोरट्यासह महिलेला ताब्यात घेतले. आरोपीकडून एका दुचाकीसह ३ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी सुनील मारुती मंडले (रा. पिपरी खुर्द, ता. आटपाडी), शुभांगी रामचंद्र बुधावले (रा. निंबवडे, ता. आटपाडी) अशी अटक केलेल्यांची नावे असल्याचे पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सुनील शामराव गायकवाड (रा. कडलास, ता. सांगोला) यांची दुचाकी मिरज रोड माऊली हॉटेल येथून चोरीला गेल्याने अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल होता. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा तपास करत असताना संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली.
याप्रकरणी सुनील मारुती मंडले (रा. पिंपरी खुर्द, ता. आटपाडी, सध्या रा. देवापूर, ता. माण, जि., सातारा) याचे नाव निष्पन्न करून त्याच्याकडून दुचाकी ताब्यात घेतली. त्यानंतर पोलिसांनी फिर्यादी सुनंदा लक्ष्मण गोडसे (रा. लक्ष्मीनगर, ता. सांगोला) या महिलेस चारचाकी गाडीतून लक्ष्मीनगर येथे सोडतो, असे म्हणून वाटेतच दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण व बोरमाळ काढून घेतली होती. हा गुन्हा दोघा आरोपींनी केल्याचे सांगितले.
पोलिसांनी त्यांच्याकडून ८ ग्रॅम सोन्याच्या गठंणसह ७ ग्रॅम सोन्याची बोरमाळ जप्त केली. आरोपींनी सांगोला-वासूद रोड येथील विनय कल्याण कांबळे यांचे नरेंद्र नगर येथील बंद घराचे कुलूप, कोयंडा तोडून त्यांच्या घरातील रोख रक्कम तसेच ३ ग्रॅमचे सोन्याचे कानातील दोन टॉप्स जोड, ७ ग्रॅम लहान मुलाचा करदोडा चोरी केल्याची कबुली देत सोन्याचे दागिने काढून दिल्याचे यावेळी खणदाळे यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.