Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'दादा बोलेना, दादा बघेना...!'

'दादा बोलेना, दादा बघेना...!'



मुंबई : खरा पंचनामा

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या चहापानाच्या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडे एकत्र आले. मात्र अजित पवारांनी मुंडेंशी बोलणं टाळलं. त्यामुळे आता मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार ठोस निर्णय घेणार का याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. मात्र, गेल्या कॅबिनेट तीन बैठकींना गैरहजर राहिलेले धनंजय मुंडे मात्र आवर्जून आज चहापान कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये अजित पवार हे धनंजय मुंडेपासून अंतर राखून उभे असल्याचे दिसले. त्यामुळे अजित पवार धनंजय मुंडेंना टाळत असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू झाल्या.

राज्यात मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे आरोपपत्रातून समोर आले आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. त्यात आज माध्यमांशी संवाद साधताना अजित पवारांनी सूचक वक्तव्य केले आहे. अधिवेशनात आरोप प्रत्यारोप होतंच असतात पण त्यात काही तथ्य असेल तर त्यावर देखील आम्ही गंभीर विचार करू, असे अजित पवार म्हणाले.

यापूर्वी देखील अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर त्यांचे मत स्पष्टपणे मांडले आहे. भ्रष्टचाराचे आरोप झाले तेव्हा अनेक दिग्गज नेत्यांना नैतिकता म्हणून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. विशेष म्हणजे विरोधकांच्या आरोपांनंतर मी देखील मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे राजीनामा द्यावा की नाही याबाबत धनंजय मुंडे यांनी ठरवावं, असं अजित पवार उघडपणे म्हणाले होते. त्यामुळे अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. पण धनंजय मुंडे यांनी तरीही राजीनामा दिला नाही. त्यानंतर अजित पवार यांनी धनंजय मुंडेसोबत धरलेला अबोला आजच्या चहापानाच्या कार्यक्रमात बरच काही सांगून गेला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.