Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यात ट्विस्ट खून प्रकरणाच्या नैतिकतेतून नाही तर प्रकृतीमुळे राजीनामा

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यात ट्विस्ट 
खून प्रकरणाच्या नैतिकतेतून नाही तर प्रकृतीमुळे राजीनामा 



मुंबई : खरा पंचनामा 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच देवगिरी बंगला गाठला आणि अजित पवार, सुनील तटकरे यांच्या बरोबर बैठक घेतली.


यावेळी धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. या घडामोडींनंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर त्यांनी एक्स सोशल मीडिया अकाउंटवर ट्विट करत मोठं वक्तव्य केले आहे. राजीनामा का दिला त्यामागच्या कारणांचा खुलासा त्यांनी केला आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. न्यायालयीने चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सद्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे.

दरम्यान, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते की नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा दिला आहे. परंतु, धनंजय मुंडेंच्या ट्विटमध्ये मात्र याचा कुठेच उल्लेख नाही. उलट वैद्यकीय कारणांमुळे राजीनामा दिल्याचे मुंडेंनी म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि त्यांच्याच पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यात समन्वय नाही की जाणूनबुजून दोघांनी वेगवेगळी वक्तव्य केली का असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.