भाजपचं ठाकरेंना चॉकलेट, जुने मित्र पुन्हा एकत्र येणार?
मुंबई : खरा पंचनामा
विधानसभा निवडणुकीत आरपारची भाषा करणाऱ्या ठाकरे गटाला आता संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटलांनी चॉकलेट दिल्याचं समोर आलंय. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी थेट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या दालनात जाऊन चंद्रकांत पाटलांनी दानवे आणि ठाकरेंना चॉकलेट दिलं.
राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात कुरघोडीचं राजकारण रंगल्याचं दिसत आहे. तर ठाकरेही महाविकास आघाडीत नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान ठाकरे आणि भाजपमध्ये पुन्हा जवळीक वाढल्याचं चित्र आहे.
या चॉकलेट भेटीवरून चर्चा रंगत असतानाच ही भेट संसदीय परंपरेनुसार असल्याचं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटलांनी दिलंय.. विशेष म्हणजे दानवे आणि ठाकरेंना चॉकलेट देत असताना दानवेंच्या दालनात उपस्थित असलेल्या काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते सतेज पाटलांना मात्र पाटील यांनी चॉकलेट दिलं नाही. त्यामुळे ठाकरेंना दिलेलं चॉकलेट हे पुन्हा कुछ मीठा हो जाये या भूमिकेतून देण्यात आलंय की शिंदेंवर दबाव वाढवून चेकमेट करण्यासाठी? याचीच राज्यभर चर्चा रंगलीय.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.