Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रविवारच्या ट्विटमुळे जयंत पाटील पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात?

रविवारच्या ट्विटमुळे जयंत पाटील पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात?



मुंबई : खरा पंचनामा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा काल सांगलीयेथे मेळावा झाला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी शशिकांत शिंदे यांनी आता फोनवरुन हॅलोऐवजी जय शिवराय बोलायचं, असं म्हटले.


आता येथून पुढे फोन लावल्यावर जय शिवराय बोलायचं, सुरुवात सांगलीतून होईल हा प्रांताध्यक्षांचा आदेश आहे, असंही ते म्हणाले. मात्र, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आजच्या ट्वीट पोस्टने चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.

मेळाव्यात बोलताना शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. कोणताही फोन आला तर सुरुवातीला जय शिवराय म्हणायचं, सांगली जिल्ह्याचा बालेकिल्ला आपण शाबूत ठेवला. परंतु, दुर्दैवाने सातारामधील बालेकिल्ला मात्र नेस्तनाभूत झाला आहे. गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेवटपर्यंत लढले, त्यांनी हार मानली नाहीत. त्यांच्यासोबत जे शेवटपर्यंत लढले ते इतिहासामध्ये अजरामर झाले. तसंच, तुम्ही देखील पक्षासोबत शेवटपर्यंत लढा, असं आवाहन शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

गेली अनेक दिवसांपासून जयंत पाटील शरद पवार गटात नाराज असून ते भाजप किंवा अजित पवार गटात जाणार अशी चर्चा रंगलेली आहे. जयंत पाटील यांनी स्वतः आपण कुठही जाणार नसल्याचं जाहीर केलं आहे. परंतु, वारंवार चर्चा ही होतच आहे. अशातच आज त्यांच्या ट्वीट पोस्टमुळे तर वेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. 'जय शिवराय' इतकीच जयंत पाटील यांची आजची पोस्ट आहे. त्यावरून हे नक्की कशाचे संकेत आहेत यावर आता चर्चा रंगली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.