Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

प्रशांत कोरटकरवर आणखी एक कलम वाढवले पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांची माहिती

प्रशांत कोरटकरवर आणखी एक कलम वाढवले
पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांची माहिती



कोल्हापूर : खरा पंचनामा

गुन्ह्यात महत्त्वाचा ठरणारा मोबाइलमधील डाटा नष्ट केल्याप्रकरणी संशयित प्रशांत कोरटकरवर याच्यावर पुरावा नष्ट केल्याचे कलम वाढविले आहे, अशी माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी दिली. पुरावा नष्ट करण्याचे कलम २४१ (बीएनएस) वाढविण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयाकडे मागणी पत्रांची प्रक्रिया पूर्ण केली असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान पुरावा नष्ट केल्याचे कलम वाढवावे, या मागणीचे निवेदन इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी गुरुवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे यांना दिले होते. या अर्जाची दखल घेऊन पूर्वी नोंदवलेल्या गुन्ह्यामध्ये संबधित कलम वाढविले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहास संशोधक सावंत यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी प्रकरणी कोरटकर याच्यावर जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

या प्रकरणात त्याच्यावर पुरावा नष्ट करण्याचे कलम २४१ (बीएनएस) वाढवावे, असा युक्तिवाद सावंत यांचे वकील अॅड. असीम सरोदे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन सुनावणी वेळी केला होता. त्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी पोलिसांना निवेदन दिले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.