कामराला तुम्हीच सुपारी दिली आहे काय? छात्या बडवू नका -धडा शिकविणारच
कॉमेडियन कामरा वरून सभा तहकूब अन मुख्यमंत्री आक्रमक
मुंबई : खरा पंचनामा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा सांगतो, आम्हाला स्टँडअप कॉमेडी आवडते. आम्ही ती पाहतो. त्याला दाद देणारे लोकं आहोत. पण त्याच्या नावाखाली मध्यंतरीच्या कालावधीत रणवीर अलाहाबादियाने ज्या प्रकारचे स्टेंटमेंट दिले, त्या असल्या गोष्टी आम्ही सहन करणार नाही. हे लोक आई-वडिलांसंदर्भात घाणेरडे स्टेटमेंट देतील आणि कुठल्यातरी ओटीटी प्लॅटफॉर्मवरून तसल्या गोष्टी चालवतील हे चालणार नाही. स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला आणि आपण शांत बसलो तर आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. हा स्वैराचार होऊच द्यायचा नाही. म्हणून यासंदर्भात जी काही कडक कारवाई करता येईल, ती केली जाईल. त्यात कुठल्याही परिस्थिती कुणीही कितीही दबाव आणला तरी संबंधितांना सोडले जाणार नाही.
आता जे काही लेफ्ट लिबरल विचार तयार झालेत. याला अर्बन नक्षलवादीही म्हणता येईल. त्यांचा उद्देश एकच आहे. समाजातील मानकांना अपमानित करणे, देशातील संस्थांना अपमानित करणे, देशांच्या संस्थात्मक संरचनेवरून लोकांचा विश्वास उठला पाहिजे अशी विधाने करणे अशा प्रकारची विधाने करणाऱ्यांना कोणत्याही स्थितीत सोडले जाणार नाही. त्यामुळे यासंदर्भात कठोरातील कठोर कारवाई केली जाईल अशी मी ग्वाही सभागृहाला देतो, असे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले, ज्या प्रकारे कुणाल कामरा यांनी हे अपमानास्पद शब्द वापरले ते सहन केले जाणार नाहीत. त्यांनी माझ्यावर शिंदेंवर सर्वांवर टीका करावी. व्यंग करावे. आम्ही टाळ्या वाजवून दाद देऊ. पण अशाप्रकारे सुपाऱ्या घेऊन कुणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल. सोडण्याचे काहीही कारण नाही. त्यामुळे मी सर्वांना सांगतो, अभिव्यक्तीवर घाला घालण्यात येत असल्याच्या छात्या बडवू नका. या गोष्टी या महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही. काहीही झाले तरी अशा प्रकारे विनाकारण प्रसिद्धी मिळवण्यासाठी सुपारी घेऊन बोलणारे हे जे लोक आहेत त्यांना कुठेतरी धडा शिकवावाच लागेल. ही मंडळी महाराष्ट्राचे मानसिक आरोग्य खराब करण्याचे काम ही मंडळी करत आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुमचे माझे राजकीय मतभेद असू शकतात, पण राज्यातील एखाद्या उच्चपदस्थ नेत्याबद्दल, ज्या नेत्याबद्दल राज्यातील जनतेमध्ये आदरभाव आहे, त्या नेत्याविषयी कुणीतरी इतक्या खालच्या दर्जाचे काहीतरी बोलतो व आमच्या समोरील बाकावरील काही जण हे तत्काळ त्याचे समर्थनार्थ उभे राहतात. लगेच एकाचे ट्विट येते, दुसऱ्याची क्लिप येते, तिसऱ्याची क्लिप येते. त्यामुळे हे कामराशी ठरवून चालले आहे की? कामराला तुम्हीच सुपारी दिली आहे काय ? असा प्रश्न विचारण्याची वेळ येथे आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.