Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले'

'औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले'



मुंबई : खरा पंचनामा

छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीवरून वातावरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांनी औरंगजेबाची कबर काढून टाकण्याचा इशारा दिला तसेच बाबरीची पुनरावृत्ती होईल असा गंभीर इशारा त्यांनी दिला होता. यापार्श्वभूमीवर सरकारने औरंगजेबच्या कबरीवर सुरक्षा वाढवली आहे.

यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हलवली नाही तर बाबरीची पुनरावृत्ती करू, असा इशारा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याआधी देखील त्यांच्यावर सडकून टीका केली. यांना महाराष्ट्र जाळून टाकायचा आहे, त्यामुळे हे सर्व चालत आहे. रावणाला बाजूला करून रामायण सांगता येईल का, अफजल खान बाजूला करून प्रतापगडाची लढाई सांगता येईल का, हिटलरला बाजूला करून दुसरे विश्व युद्ध सांगता येईल का, असे प्रश्न आव्हाड यांनी विचारले आहेत. या सर्व गोष्टीला सरकारचा देखील एक छुपा पाठिंबा आहे, असा आरोप देखील त्यांनी सरकारवर केला होता.

औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करायची म्हणजे काय करायचं? महाराष्ट्राचीच ही माती आहे. सौंदर्याकरण हा विषय वेगळा आहे. एकदाची ती कबर उखडा. दररोज तेच तेच बोललं जातंय. इथे हजारो विषय पेंडींग असताना केवळ औरंगजेबवर बोललं जातंय इतिहासातून औरंगजेबाला काढू शकत नाही. औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.