मिरजेत गोवा बनावटीच्या दारूसाठ्यासह 22 लाखाचा मुद्देमाल जप्त
उत्पादन शुल्क विभागाची आठ दिवसात दुसरी कारवाई; 2.45 लाखांची दारू जप्त : अधीक्षक पोटे
सांगली : खरा पंचनामा
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने 2.45 लाखांच्या गोवा बनावटीच्या दारूसह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. मिरज-पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमिजवळील ओढ्याजवळ परिसरात ही कारवाई करण्यात आली. यावेळी गोवा बनावटीची विदेशी दारू, मोबाईल, दारू वाहतूक करणारी चारचाकी असा 22 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिली.
याप्रकरणी अरविंद तानाजी बेडगे, अजिंक्य विजय गवळी (दोघेही रा. मिरज) या दोघांना अटक करण्यात आली आहे. मिरजेतील पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ एका काळ्या रंगाच्या चारचाकीतून गोवा बनावटीच्या विदेशी दारूची तस्करी होणार असल्याची माहिती मिरजेचे निरीक्षक सुपे यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने या ठिकाणी सापळा लावला. तेथे काळ्या रंगाची चारचाकी (एमएच 09 जीयू 0055) आल्यानंतर ती थांबवून तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीची विदेशी दारू सापडली. दारूसाठा महाराष्ट्र राज्याचा महसूल बुडवून आयात करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. गाडीतून 2.45 लाखांचा दारूसाठा, चारचाकी, मोबाईल असा 22 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाने निरीक्षक दीपक सुपे, दुय्यम निरीक्षक अजय लोंढे, उदय पुजारी, स्वप्नील अटपाडकर, विनायक खांडेकर, कविता सुपने, शाहीन शेख, स्वप्नील कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.