'...अरे काय पोटात घ्या, पोट फुटायला लागलं'
बारामती :खरा पंचनामा
'मला काही लोकांचा फोन येतो की, दादा पोटात या, पोटात घ्या. अरे काय पोटात घ्या? पोट फुटायला लागलंय. अशा शब्दात संताप व्यक्त करताना फोन केला त्यांना शरम कशी वाटत नाही, असा प्रश्न अजित पवार यांनी बारामतीत बोलताना उपस्थित केला.
बारामतीत दिव्यांगांना मोफत सायकल वाटप करण्यात आली. या कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांच्याकडे मारहाणीच्या घटनेचा एक व्हिडीओ आला होता. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलताना पालकांवर संताप व्यक्त केला. तसेच, मकोका लावण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
दोन दिवसांपूर्वी बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयजवळील हॉटेलमध्ये एका युवकाला २ ते ३ जणांनी मिळून बेदम मारहाण केली. या मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियात व्हायरल झाला. तरूणावर झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
अजित पवार म्हणाले, परवा माझ्याकडे एक क्लिप आली. सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालं. त्याच्यामध्ये एकाला मारहाण केली. कुत्र्याला जसं मारत असतील तसंच मारलं. मी पोलिसांना सांगितलं कोणीही असो त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. हे जर पुढे असंच चालत राहिलं तर मी मकोका लावीन, असा इशारा अजित पवारांनी यावेळी दिला.
तसेच ते पुढे म्हणाले, आपली मुलं काय करत आहेत? हे लक्ष ठेवणं पालकांची नैतिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी पालकांनी पार पाडावी. मला काही लोकांचा फोन येतो की, दादा पोटात या, पोटात घ्या. अरे काय पोटात घ्या? पोट फुटायला लागलंय. ज्यांनी फोन केला त्यांना शरम कशी वाटत नाही, असं सांगायला. सगळ्यांना नियम सारखाच आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.