Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शेतकऱ्यांना गाळ, माती, मुरूम, दगड मिळणार विनामूल्य

शेतकऱ्यांना गाळ, माती, मुरूम, दगड मिळणार विनामूल्य

मुंबई : खरा पंचनामा

राज्यातील शेतकरी, घरकुल लाभार्थी आणि शासकीय बांधकामांसाठी शेततळी, पाझर तलाव, महसुली नाले आणि बंधाऱ्यांमधून निघणारा गाळ, माती, मुरूम आणि दगड विनामूल्य मिळणार आहे. या निर्णयामुळे शेत रस्ते सुधारण्यासाठी लागणारा मुरूम आणि माती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होईल, तसेच शेतीला जोडणारे रस्ते मजबूत होतील, याबाबत महसूल विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.

मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना मंजूर करण्यात आली आहे. गावागावात पाणंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे असतात. मात्र, अनेक ठिकाणी पाणंद रस्त्यांची अवस्था खराब असून, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीत जाण्यास अडचणी येतात. याच पार्श्वभूमीवर सरकारने 'मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना' प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतांमध्ये जाण्यासाठी सोपा मार्ग उपलब्ध होणार असून, शेतीचे उत्पादन आणि कार्यक्षमता वाढणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बळकट होईल आणि गावांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. शेतापर्यंत रस्ता असल्यास शेतमाल वाहतूक करणे सोपे होते आणि शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या अवजड यंत्र सामग्रीचा वापरही सहज शक्य होतो. हा निर्णय शेतकरी, ग्रामपंचायती आणि संपूर्ण कृषी क्षेत्रासाठी दिलासा देणारा ठरणार आहे.

याशिवाय घरकुल लाभार्थी आणि शासकीय बांधकामांसाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील शेतकरी, घरकुल लाभार्थी आणि शासकीय बांधकामांसाठी शेततळी, पाझर तलाव, महसूली नाले आणि बंधाऱ्यांमधून निघणारा गाळ, माती, मुरूम आणि दगड विनामूल्य मिळणार आहे. या निर्णयामुळे शेतरस्ते सुधारण्यासाठी लागणारा मुरूम आणि माती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतीला जोडणारे रस्ते मजबूत होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.