धोनी, सचिन, कपिलदेव, अभिनव बिंद्रा, नाना पाटेकर बॉर्डरवर जाणार?
सरकारकडून टेरिटोरियल आर्मी सक्रीय करण्याचे आदेश
दिल्ली : खरा पंचनामा
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल आहे. तो पॅराशूट रेजिमेंटचा आहे. यासाठी त्यानं प्रशिक्षणही घेतले आहे. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा भारतीय हवाई दलात ग्रुप कॅप्टन आहे.
2010 मध्ये सचिनला ही रॅक देण्यात आली होती. सचिन तेंडुलकर युवकांचा स्टार आहे. त्यामुळे त्याच्या माध्यमातून युवकांना भारतीय लष्कराकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला गेला.
1983 मधील विश्व कप विजेता भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान कपिल देव यांनाही प्रादेशिक सेनेत मानद कर्नल ही रँक दिली आहे. कपिल देव यांनीही भारतीय सैन्यासाठी अनेक वेळा आपले योगदान दिले आहे.
अभिनेता नाना पाटेकर 1988 मध्ये कॅप्टन म्हणून प्रादेशिक सेनेत दाखल झाले. त्यांना प्रहार चित्रपटासाठी तीन वर्ष लष्करी प्रशिक्षण घेतले होते. त्यांनी जनरल व्ही. के. सिंह यांच्यासोबत काम केले आहे. त्यावेळी ते कर्नल पदावर होते.
भारताचा पहिला वैयक्तीक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा हा ही प्रादेशिक सेनेत अधिकारी आहे. त्याला मेजर करण्यात आले आहे. अभिनव बिंद्राने आपल्या क्रीडा कौशल्याबरोबर भारतीय सैन्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.
प्रादेशिक सेना ही एक निमलष्करी दल आहे. त्याला संरक्षणाची दुसरी फळी देखील म्हटले जाते. या सेनेने देशातील अनेक मोठ्या ऑपरेशन्समध्ये काम केले आहे. आता युद्धाच्या आघाडीवर असलेल्या सैनिकांच्या मागे सावली म्हणून काम करून त्यांना मदत करण्यास हे दल सज्ज आहे.
सध्या प्रादेशिक सेनेत ५० हजार सदस्य आहेत. तसेच ६५ विभागीय युनिट्स आहे. (जसे की रेल्वे, आयओसी) आणि बिगर-विभागीय पायदळ आणि अभियंता बटालियनमध्ये आहेत. त्यांचे प्रशिक्षण अगदी सैन्यासारखेच असते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.