घरातच आढळले गद्दार, पैशांसाठी विकले गेले!
पाकिस्तानला माहिती पुरवायचे
दिल्ली : खरा पंचनामा
भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी २ देशद्रोह्यांना अटक केली आहे. हे दोघे देशद्रोही दिल्लीस्थित पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांसाठी काम करत होते. अधिकाऱ्यांना माहिती गोळा करून पाठवत होते. पोलिसांनी दोन्ही आरोपींना मालेरकोटला येथे अटक केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पंजाबचे पोलिस महासंचालक गौरव यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ही माहिती अधिकृतपणे शेअर केली. डीजीपी म्हणाले की, एक आरोपी भारतीय सैन्याच्या हालचालींबाबतची गोपनीय माहिती पाकिस्तानातील त्याच्या हँडलरकडे पाठवत होता. चौकशीत त्याने आपल्या दुसऱ्या साथीदाराचं नाव उघड केलं, आणि त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या व्यक्तीलाही अटक केली.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणाशी संबंधित आरोपी पैशांच्या मोबदल्यात देश आणि सैन्याशी संबंधित माहिती पाकिस्तानला पुरवत होते. त्यांना पैसे ऑनलाइन माध्यमातून देण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोघंही त्यांच्या पाकिस्तानस्थित संपर्कात नियमित संवादात होते आणि त्यांच्या सूचनांनुसार काम करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरोपींनी मिळालेल्या पैशांचा काही भाग इतर व्यक्तींनाही दिला जात होता. पोलिसांनी त्यांच्याकडून २ मोबाईल फोन जप्त केले आहेत. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू आहे.
डीजीपी गौरव यादव म्हणाले की, 'ही कारवाई सीमेपलीकडून सुरू असलेल्या हेरगिरी कारवायांच्या विरोधात आहे. आरोपींच्या चौकशीतून त्यांच्या आर्थिक व्यवहारांचे तपशील समोर येत असून, अजून किती लोक या नेटवर्कचा भाग आहेत हे शोधण्याचे काम सुरू आहे. लवकरच या प्रकरणाच्या मुळाशी आम्ही पोहोचू आणि आरोपींना अटक करू'.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.