सांगलीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक
दुचाकीसह 1.35 लाखांचा मुद्देमाल जप्त : विश्रामबाग पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शहरातील मिरज रस्त्यावरील एका कॉलेजच्या पाठीमागे गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक दुचाकी, 2 किलो गांजा असा 1.35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली.
श्रेयश गणेश पाटील (वय २०, रा. कोळी गल्ली, सावळज, ता. तासगाव), अविष्कार प्रकाश माळी, (वय १९, रा. माळी गल्ली, गोटखिंडी, ता. वाळवा), मयुर विलास घारे (वय २५, रा. माळी गल्ली, गोटखिंडी, ता. वाळवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नशामुक्त अभियान अंतर्गत अंमली पदार्थ विक्री, साठा, तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार निरीक्षक भालेराव यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शाखेतील प्रशांत माळी यांना तिघेजण गांजा विक्रीसाठी मिरज रस्त्यावरील एका कॉलेजच्या मागे येणार असल्याची माहिती मिळाली.
पथकाने तेथे सापळा रचला. तिघेजण दुचाकीवरून (एमएच १० ई एल ०५१६) तेथे आले. त्यांचा संशय आल्याने पथकाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील सॅकची तपासणी केल्यावर त्यामध्ये गांजा सापडला. त्याबाबत कसून चौकशी केल्यावर त्यांनी तो विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. दुचाकीसह गांजा जप्त करून त्यांना अटक करण्यात आली.
विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चेतन माने, अमर मोहिते, संदिप साळुंखे, बिरोबा नरळे, प्रशांत माळी, सचिन घोदे, आर्यन देशिंगकर, पोशि/महमद मुलाणी, योगेश पाटील, गणेश बामणे, जावेद आत्तार, अभिजीत पाटील, दिपाली नेटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.