Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जयश्री पाटील यांना पक्षात घेवू नका! मुंबईत भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी निरोप?

जयश्री पाटील यांना पक्षात घेवू नका! 
मुंबईत भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी निरोप?

मुंबई : खरा पंचनामा

वसंतदादा पाटील यांची नातसून जयश्री पाटील या बुधवारी भाजप प्रवेश करणार असतानाच दुसरीकडे भाजपमधील खदखद आता समोर येत आहे. जयश्री पाटील यांना पक्षात घेवू नका असा निरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी पाठवण्यात आला आहे. असे निरोप कोणी पाठवले, यावर सांगलीतल्या राजकारणात तर्कवितर्क लढवले जात आहे.

भाजपकडून महापालिका निवडणुकांची तयारी सुरू असून स्थानिक पातळवरील वजनदार नेत्यांना पक्षात प्रवेश दिला जात आहे. जयश्री पाटील यांच्या पक्षप्रवेशासाठी अजित पवार आणि भाजप दोन्ही बाजूंनी जोरदार प्रयत्न सुरू होते. अखेर सोमवारी त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय जाहीर केला आहे. एकीकडे जयश्री पाटील यांच्या प्रवेशाची पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात चर्चा होत असली तरी दुसरीकडे भाजपमधील निष्ठावंतांची खदखदही वाढत आहे. 'बँक घोटाळ्यातून स्वतःला आणि दोन्ही मुलांना वाचवण्यासाठी जयश्री पाटील प्रवेश करीत आहेत, त्यांना घेवू नका', असे निरोप मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगली परिसरातून देण्यात आल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. आता देवेंद्र फडणवीस याबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.