कार शोरूम फोडणाऱ्या गुजरातमधील टोळीचा पर्दाफाश, एकाला अटक
सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील कारचे शोरूम फोडून चोरी करणाऱ्या गुजरात येथील टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या टोळीतील एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून अन्य संशयितांचा शोध सुरु असल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
दिनेश गजेंद्र मोहिते (वय २७, रा. लवाछा, ता. वापी, जि. वलसाड, गुजरात) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर मुरली मनोहर पवार (रा. उमरगाव, जि. वलसाड, गुजरात), करण परलाल मोहिते (रा. सायना, मालेगाव, जि. नाशिक), रोहित (पुर्ण नाव माहित नाही, रा. लवाछा, ता. वापी, जि. वलसाड, गुजरात) अक्षय (पुर्ण नाव माहित नाही रा. लवाछा, ता. वापी, जि. वलसाड, गुजरात) अशी पसार झालेल्या संशयितांची नावे आहेत. दि. 11 जून रोजी रात्री कोल्हापूर रस्त्यावरील कारचे शोरूम फोडून दागिने आणि रोकड असा 9.67 लाखांचा ऐवज लंपास केला होता. याबाबत संतोष कोळी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथक तयार केले होते.
पथक चोरट्यांचा शोध घेत असताना पथकातील संदीप नलवडे यांना ही चोरी गुजरात येथील वरील टोळीने केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली पथकाने गुजरात येथे जाऊन दिनेश मोहिते याला अटक केली. त्यावेळी अन्य संशयित पसार झाले. मोहिते हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडी, गांजा वाहतुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबरच्या सहायक निरीक्षक रुपाली बोबडे, एलसीबीचे उपनिरीक्षक कुमार पाटील, संदीप पाटील, बसवराज शिरगुप्पी, श्रीधर बागडी, सुशिल म्हस्के, संदीप नलवडे, प्रकाश पाटील, अभिजित माळकर, विनायक सुतार, सोमनाथ पतंगे, सुमित सुर्यवंशी, सुरज थोरात, सुशांत चिले सायबर पोलीस ठाणेकडील अभिजित पाटील, अजय पाटील, करण परदेशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.