सात लाखांच्या लाच मागणी प्रकरणी सांगली महापालिकेच्या उपायुक्ताविरुद्ध गुन्हा
24 मजली इमारत बांधकाम परवानगीसाठी मागितले पैसे : सांगली एसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगलीत एका कंपनीमार्फत बांधण्यात येणाऱ्या 24 मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी 10 लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 7 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या उपयुक्ताविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक अनिल कटके यांनी दिली.
वैभव विजय साबळे (वय ३१, रा. ग्रिन एकर्स, फ्लॅट नं.४०३, धामणी रोड सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या उपयुक्ताचे नाव आहे. तक्रारदार यांच्या कंपनीमार्फत सांगलीत 24 मजली इमारत बांधण्यात येत आहे. त्या इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी उपायुक्त साबळे यांनी कंपनीच्या संचालकाकडे 10 लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती 7 लाख रुपये लाचेची मागणी केली. मात्र बांधकाम व्यवसायिकाला लाच देणे मान्य नसल्याने त्याने याबाबत सांगलीतील एसीबीकडे फेब्रुवारीमध्ये तक्रार दिली होती. त्या तक्रारीची पडताळणी दि. 25 फेब्रुवारी रोजी केल्यावर साबळे यांनी 7 लाखांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आज सोमवारी साबळे यांच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीचे तत्कालीन उपाधीक्षक उमेश पाटील, सध्याचे उपाधीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनायक भिलारे, किशोर कुमार खाडे, अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, सीमा माने, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, अतुल मोरे, चंद्रकांत जाधव, विणा जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.