विधवेवर बलात्कार करणाऱ्या 60 वर्षाच्या पुरुषाला सहा महिलांनी जिवंत जाळलं!
गजपती (ओडिशा) : खरा पंचनामा
ओडिशाच्या गजपती जिल्ह्यात महिलांनी आपल्या बलात्काराच्या आरोपीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ६० वर्षीय पुरुषाचा खून करून त्याचा मृतदेह जाळण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आठ महिलांसह एकूण १० जणांना अटक केली आहे.
मृताच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार केल्यानंतर मोहना पोलिसांनी तपास सुरू केला. मोहना पोलिस ठाण्याचे प्रभारी बसंत सेठी यांनी सांगितलं की, "आधी पुरुषाला ठार मारलं आणि त्यानंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आला." गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलातील टेकडीवरुन पोलिसांनी जळलेली हाडे आणि राख जप्त केलीये.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना ३ जूनच्या रात्री घडली. आरोपी ६० वर्षीय पुरुषावर गावातील ५२ वर्षीय विधवेवर बलात्कार केल्याचा आरोप होता. याआधीही त्याच्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याचे इतर महिलांनी सांगितले आहे.
पोलिसांनी सांगितले की, पीडित महिलांनी एकत्र येऊन बैठक घेतली आणि आरोपीला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्या रात्री महिला आरोपीच्या घरी पोहोचल्या, जिथे तो झोपलेला होता. ५२ वर्षीय पीडित महिलेसह इतर महिलांनी मिळून त्याचा खून केला. यावेळी दोन पुरुषांनी महिलांना मदती केली.
पोलिस ठाण्याचे सेठी म्हणाले, "अटक केलेल्या सहा महिलांनी चौकशीदरम्यान खून केल्याचे कबूल केले आहे. त्या पुरुषाने पूर्वी त्यांच्यावरही लैंगिक अत्याचार केले होते आणि या त्रासातून मुक्त होण्यासाठी त्यांनीही हे टोकाचे पाऊल उचलले." दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून अटकेतील सर्व आरोपींवर गंभीर आरोप दाखल करण्यात आले आहेत. ही घटना जिल्ह्यात खळबळ उडवणारी ठरली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.