Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

95 हजारांची लाच घेताना पोलीस निरीक्षकांसह महिला पोलीस अटकेत

95 हजारांची लाच घेताना पोलीस निरीक्षकांसह महिला पोलीस अटकेत

धाराशिव : खरा पंचनामा

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने जोर धरला असून अनेक बडे मासे जाळ्यात अडकत आहेत. विशेषतः महसूल खात्यात तहसिलदार, तलाठी ते ग्रामसेवकांपर्यंत अनेक अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.

आता, पोलीस खात्यातील अधिकाऱ्यावर एसीबीने कारवाई केली आहे. दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत 95 हजार रुपये स्वीकारताना धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व महिला पोलीस अंमलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. याप्रकरणी आरोपींवर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल 306 अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षकांकडून लाचेची मागणी करण्यात आली होती, अशी प्राथमिक माहिती आहे.

2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन तडजोडी अंति 95 हजार रुपये रक्कम घेण्याचे पोलिसांनी मान्य केले होते. मात्र, हजार रुपये रक्कम घेण्याचे पोलिसांनी मान्य केले होते. मात्र, तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. त्यात, धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके व एका महिला अंमलदार लोखंडे यांना लाच लुचपत विभागाने ताब्यात घेतले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.