Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पत्नीने झोपेतच पतीच्या डोक्यात घातली कुऱ्हाड कुपवाडमधील घटना : संशयित पत्नीला अटक सतत शारीरिक लगट करत असल्यामुळे केला खून

पत्नीने झोपेतच पतीच्या डोक्यात घातली कुऱ्हाड 
कुपवाडमधील घटना : संशयित पत्नीला अटक 
सतत शारीरिक लगट करत असल्यामुळे केला खून

सांगली : खरा पंचनामा 

लग्न होऊन अवघे काही महिने झाले असतानाच पत्नीने पतीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृण खून केला. पती झोपेत असतानाच पत्नीने डाव साधला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पत्नीला अटक करण्यात आल्याची माहिती कुपवाडचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिली. दरम्यान पती सतत लगट करत असल्याच्या कारणावरून तिने त्याचा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.

अनिल तानाजी लोखंडे (वय 53, रा. प्रकाशनगर, कुपवाड) असे मृताचे नाव आहे. तर राधिका बाळकृष्ण इंगळे (वय 27, रा. वड्डी, ता. खटाव, जि. सातारा) असे संशयित पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी मुकेश मोहन लोखंडे (वय 35) यांनी फिर्याद दिली आहे.

अनिल लोखंडे यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले आहे. त्यांना दोन मुलेही आहेत. मे मध्ये त्यांनी राधिका हिच्याशी दुसरे लग्न केले. लग्न झाल्यापासून अनिल पत्नी राधिकाशी सतत लगट करत होता. पण राधिकाला ते आवडत नव्हते. त्याच कारणातून चिडून तिने पती अनिल याचा खून केला.

घटनेनंतर कुपवाडचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने हालचाली करत संशयित पत्नी राधिका हिला अटक केली. आज दुपारी तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.